Coordinators Required

स्वयंसिद्धा फौंडेशन, मुंबई, गेली अनेक वर्ष स्वयंरोजगार व बचतगट हे विषय घेवून कार्यरत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातून संस्थेच्या उपक्रमांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे संस्थेने विस्ताराच्या दृष्टीने संयोजिका व क्षेत्रीय संयोजक या पदांची निर्मिती करून विस्तार करण्याचे निश्चित केले आहे. सुरुवात मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांमधून झाली आहे. सुमारे २० संयोजीकांची पहिली टीम निर्माण झाली असून त्यांचे प्रशिक्षण इत्यादी सुरु आहे.

संयोजिका म्हणजे कोण ?
संयोजिका संस्थेची तिच्या विभागातील अधिकृत प्रतिनिधी असते, संयोजीकेच्या नेतृत्वाखाली त्या विभागातील संस्थेचे सदस्य येतात, संस्थेच्या उपक्रम संयोजिका तिच्या नेतृत्वाखालील सदसयांसाठी राबविते.

अन्य प्रश्नांसाठी कोणास संपर्क करावा ?
अन्य कुठल्याही प्रश्नांसाठी 9920987512 या क्रमांकावर संपर्क करावा

या कामासाठी किती वेळ द्यावा लागेल ?
या कामासाठी महिन्यातून किमान १ ते २ दिवस द्यावे लागतील तसेच सदस्य व संस्थेसोबत फोन, इंटरनेट व इतर माध्यमातून संपर्कात राहावे लागेल

या कामासाठी प्रशिक्षण कोण देईल ?
संस्था संयोजिकाना कामाचे प्रशिक्षण देते, तसेच क्षेत्रीय संयोजक व संस्थेचे पदाधिकारी संयोजिकांच्या संपर्कात असतात.

मी मुंबई बाहेर राहते , मी अर्ज करू शकते का ?
होय, संस्था संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करणार आहे, जर तुम्हाला संयोजिका या पदावर काम करायचे असेल तर अर्ज भरावा, जेव्हा संस्था आपल्या जिल्ह्यात विस्तारकार्य सुरु करेल तेव्हा तुम्हांस संपर्क केला जाईल

या कामासाठी मोबदला मिळतो का ?
संस्था या कामासाठी मानधन देते

संयोजिका होण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
संयोजिका होण्यासाठी  येथे असलेला ऑनलाइन अर्ज भरव

 

SHG Workshop at Dadar

Swayamsiddha Foundation, Mumbai organized an Awareness Programme for Self Help Groups (Bachat Gat) at Dadar on 11.06.2017. The programme was attended by 30 participants. Detailed information on various aspects of SHG movement and ways and means to transform SHG into a thriving business enterprise was disseminated to the gathering.

Members of these groups are now enrolling Swayamsiddha under its Membership Enrollment Programme.