जागतिक कविता दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा
उमंग मंच (स्वयंसिध्दा फाउंडेशन)
स्वयंसिद्धा फाउंडेशन ही महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी एक मुंबईस्थित संस्था आहे. संस्था सन 2006 पासून कार्यरत असून विविध क्षेत्रांमध्ये महिलांना प्रोत्साहन देत त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे.
याच उद्देशाने, स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या ‘उमंग मंच’ या सांस्कृतिक विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून ‘जागर कवितेचा’ या काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आम्ही आपल्याकडून मनस्वी, संवेदनशील आणि प्रेरणादायी कविता आमंत्रित करत आहोत. ही स्पर्धा स्त्री व पुरुष अशा सर्वांसाठी खुली आहे.
तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या काव्यकौशल्याचा आविष्कार सादर करावा आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी साधावी, ही नम्र विनंती.
अंतिम तारीख: 10 एप्रिल
निकाल: 20 एप्रिल (ई-मासिक)
विजेत्यांना कवी संमेलनात निबंध वाचनाची संधी : 01 मे 2026
निवडक कवींना दिनांक 01 मे, 2026 रोजी आयोजित होणाऱ्या ऑनलाईन कवी संमेलनात आपली कविता सादर करण्याची संधी मिळेल. हा कार्यक्रम यूट्यूब व इतर समाज मध्यमांवर थेट प्रक्षेपित होईल.
402, Rele Smruti, Nadiadwala Colony No.1
S.V. Road, Malad West, Mumbai - 400064
📱 8108921295
📧 swayamsiddhafoundation@gmail.com