Swayamsiddha Foundation

बोलती हो

आजच्या यांत्रिक युगात सर्वजण जगण्याच्या धावपळीमध्ये व्यस्त आहे. कोणालाच कुणाचे सुखदुःख ऐकण्यास वेळ नाही. बरेच वेळा आपणांस कुणाच्यातरी आधाराची गरज असते किंवा किमान आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं अशी अपेक्षा असते. आम्ही स्वयंसिद्धा फाउंडेशन आमच्या महिला भगिनींसाठी घेऊन आलो आहोत एक ऐकणारा कान! म्हणजेच बोलती हो

यामध्ये तुम्ही तुमच्या व्यथा, तुम्हाला असणारे दुःख, तुम्हाला येणाऱ्या अडचणी आम्हाला मोकळेपणाने सांगू शकता. आम्ही तुम्हाला आमच्या परीने काही समाधान सूचवू किंवा कुणाकडे तरी आपलं मन मोकळे केल्याचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या मनाचे ओझे नक्कीच हलके होईल.

तुमचे नाव नेहमीच गोपनीय राहील. तुम्ही तुमच्या समस्या तुमच्या मनातील काही गोष्टी आम्हाला सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी तीन ते पाच या वेळेत 8108921295 या नंबर वर फोन करून कळवू शकता, आम्हाला swayamsiddhafoundation@gmail.com या मेल द्वारे ही तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता, किंवा खालील फॉर्म सबमिट करून देखील तुम्ही व्यक्त होऊ शकता. विश्वास ठेवा तुम्ही एकट्या नाही आम्ही तुमच्या सोबत नेहमीच आहोत

फॉर्म द्वारे व्यक्त व्हा

[forminator_form id="3003"]
Share: Facebook Twitter Linkedin

Comments are closed.